Tuesday, January 03, 2017
आपले काही चुकले का?
मस्त दंगा सुरू असायचा
खेळ रंगात आलेला असायचा
अचानक वडिलांची मोठ्या आवाजातील हाक यायची...
वाटायचे,
आपले काही चुकले का?
परीक्षेचे दिवस, शेवटच्या क्षणापर्यंत केलेला अभ्यास
तो सर्व उत्तर पत्रिकेत उतारण्यात उडालेली मोठी धांदल
अचानक भर वर्गात सर उभे करायचे...
वाटायचे,
आपले काही चुकले का?
ऑफिस मध्ये कामाची गडबड
बजेट आणि शेड्युल सांभाळण्याची तारेवरची कसरत
अचानक बॉस चा फोन यायचा, लगेच भेटायला ये...
वाटायचे,
आपले काही चुकले का?
दिवसाच्या दगदगी नंतर घरी जायची लगबग
सिग्नल लागल्यामुळे गाडी झेब्रा क्रॉसिंग च्या मागे उभी
अचानक समोर पांढऱ्या गणवेशातील मामा समोर दिसतो
वाटायचे,
आपले काही चुकले का?
#मम